AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिसची खास स्कीम;पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा!
समाचारन्यूज १८ लोकमत
पोस्ट ऑफिसची खास स्कीम;पती-पत्नीला मिळेल 59,400 रुपयांचा फायदा!
➡️ पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक छोट्या बचत योजना चालवल्या जातात. भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी या योजना अत्यंत फायद्याच्या आहेत. शिवाय पोस्टाच्या या योजनांमध्ये तुम्हाला गॅरंटी देखील मिळते आणि जोखीमही कमी आहे. पोस्टाच्या अशा एका योजनेबाबत जाणून घ्या ज्या माध्यमातून पती आणि पत्नी दोघंही कमाई करू शकतात. ➡️ पोस्टाच्या या खास योजनेअंतर्गत पती-पत्नी मिळून 59400 रुपये वार्षिक कमाई करू शकतात. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीम असं या योजनंचं नाव आहे. तुमच्या मंथली कमाईबाबत बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला दरमहा 4950 रुपये मिळतील. तुम्ही या योजनेत जॉइंट अकाउंट सुरू करू शकता. ➡️ या स्कीममध्ये जॉइंट अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल. पती पत्नी मिळून वर्षाला 59,400 रुपयांपर्यंतची कमाई करू शकतात. काय आहे MIS स्कीम? ➡️ MIS योजनेत तुम्ही सिंगल किंवा जॉइंट खातं उघडू शकता. वैयक्तिक खातं उघडल्यास तुम्ही कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. मात्र तुम्ही जॉइंट खातं उघडणार असाल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करता येतात. ही योजना निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज दर 6.6 टक्के मिळत आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
93
11
इतर लेख