AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिसची खास बचत योजना!
समाचारन्यूज १८ लोकमत
पोस्ट ऑफिसची खास बचत योजना!
➡️ पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना प्राधान्य देतात. सरकारची हमी असल्यानं यात पैसे बुडण्याची शक्यता नसते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे.पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही या योजनेत पैसे गुंतवता येतात. या योजनेत तुम्ही दररोज 70 रुपये याप्रमाणे दरमहा 2 हजार रुपये गुंतवून 15 वर्षांत लखपती बनू शकता. ➡️ पीपीएफ योजनेत चक्रवाढ पद्धतीनं व्याज मिळतं. म्हणजेच मुद्दलाच्या रकमेवर मिळणारं व्याजही मुद्दलात जमा करून त्यावर व्याज दिलं जातं. थोडक्यात व्याजावर व्याज मिळतं. यामुळे या योजनेत परतावा अधिक चांगला मिळतो. गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेऊन व्याजदर बदलले जातात. पीपीएफ योजनेत 7.1 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. ➡️ तुम्ही दरमहा 1 हजार याप्रमाणे वर्षाला 12 हजार रुपये दरमहा जमा केले तर 15 वर्षे मुदतीच्या या योजनेत तुम्ही एकूण 1 लाख 80 हजार रुपये गुंतवाल. यावर तुम्हाला 1 लाख 35 हजार 567 रुपये व्याज मिळेल. मुदत संपल्यानंतर तुम्हाला तब्बल 3 लाख 15 हजार 567 रुपये इतकी रक्कम मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त दररोज 35 ते 40 रुपये वाचवावे लागतील. ➡️ तुम्ही दररोज 70 रुपये वाचवून महिन्याला 2 हजार रुपये याप्रमाणे वर्षाला 24 हजार रुपये गुंतवले तर या योजनेत एकूण 3 लाख 36 हजार रुपये गुंतवाल. यावर व्याज म्हणून 2 लाख 71 हजार 135 रुपये मिळतील. मुदतपूर्तीनंतर तुम्हाला एकूण 6 लाख 31 हजार 135 रुपये मिळतील. मुदत संपण्यापूर्वी खातं बंद करता येतं ➡️ कोणत्याही कारणामुळे तुम्हाला 15 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच पैशांची गरज भासली, तर तुम्ही मुदतीपूर्वी पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. वैद्यकीय कारणासाठी पूर्ण रक्कम काढता येते. खातेदार स्वत: किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास तुम्ही पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करू शकता. खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्ती या खात्यातून सर्व पैसे काढू शकतो. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
94
23
इतर लेख