योजना व अनुदानTV9 Marathi
पोस्टाच्या ‘आरडी’ योजनेतून मिळवा अधिक नफा!
➡️पैशांची बचत करणे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी अनेक बचत योजना असतात ज्या माध्यमातून आपण पैशांची बचत करू शकतो. तसेच आपण बचत केलेल्या पैशांवर आपल्याला चांगला परतावा देखील मिळतो. पोस्टाची आरडी योजना ही यापैकीच एक आहे. तुम्ही दर महिन्याला कमीत कमी १०० व जास्तीत जास्त कितीही रुपये या योजनेमध्ये जमा करू शकता. आरडीवर पोस्टाकडून सध्या ५.८ टक्के व्याज देण्यात येते. कोणाला उघडता येते खाते? ➡️पोस्टाच्या या योजनेमध्ये कोणालाही खाते उघडता येते. ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे तो स्व:ता आपले खाते उघडू शकतो. तर ज्याचे वय हे १८ वर्षांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीचे खाते त्याच्या आईवडिलांच्या संमतीने उघडता येते. आरडीमध्ये तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. या योजनेचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे एक व्यक्ती कितीही आरडी खाते काढू शकते. गुतंवणूक किती करावी लागते? ➡️या योजनेमध्ये गुंतवणुकीचे असे काही बंधन नाही. तुम्ही दर महिन्याला कमीत कमी १०० रुपयांपासून जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवू शकता. तुम्ही जर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात म्हणजेच १ तारखेपासून १५ तारखेपर्यंत खाते सुरू केले, तर तुम्हाला दर महिन्याच्या १५ तारखेला तुम्ही जमा करत असलेल्या रकमेचा हाप्ता जमा करावा लागतो. आणि समजा तुम्ही जर १५ तारेखेनंतर आरडी ओपन केलेली असेल तर दर महिन्याच्या तीस तारखेरला तुम्हाला हफ्ता जमा करावा लागतो. मिळणारे लाभ ➡️ही पोस्टाची एक छोटी बचत योजना आहे. दर महिन्याला १०० ते १००० रुपये बाजूला काढणे सहज शक्य असते. हेच पैसे पोस्टाच्या आरडीमध्ये गुंतवल्यास तुमची बचत देखील होते आणि पोस्टाकडून तुम्हाला ५.८ टक्क्यांनी व्याज देखील मिळते. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही पोस्टामध्ये जी आरडी काढली आहे, त्याचे सलग १२ हप्ते भरल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लोन देखील काढता येते. संदर्भ:- TV9 Marathi,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
5