AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्टाची भन्नाट योजना; आता घरबसल्या प्रत्येक महिन्याला होणार कमाई!
कृषि वार्तासकाळ
पोस्टाची भन्नाट योजना; आता घरबसल्या प्रत्येक महिन्याला होणार कमाई!
👉कोरोनाकाळात भारताची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अशा काळात ज्यांना गुंतवणूक करायचे आहेत त्यांना आता एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजनामध्ये गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. 👉पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आता ग्राहकांन मोठा फायदा होईल. या पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. आज आपण पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेबद्दल (POMIS) माहिती जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे आपण दरमहा पैसे कमावू शकता. जाणून घेऊया ही योजना काय आहे आणि कशी गुंतवणूक केली जाते. 👉इंडिया पोस्टच्या संकेतस्थळानुसार, पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) ६.६ टक्के व्याज मिळते. या योजनेत ग्राहक किमान १००० रुपये जमा करू शकतो. जॉईंट खात्याद्वेर जर गुंतवणूक केली तर आपल्याला दुप्पट फायदा मिळू शकतो. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता, जर तुम्ही जॉईंट खाते उघडले असेल तर जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. 👉मासिक उत्पन्न योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून त्यामध्ये तुम्ही प्रत्येक पाच वर्षांनी वाढ करु शकता. या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणूकवर दरमाह व्याज मिळते. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत कोणताही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. या योजनेत खाते उघडायचे असल्यास पोस्टात तुमचं सेव्हिंग खातं असणं गरजेच आहे. तसेच तुम्हाला ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड) द्यावं लागेल. तसेच दोन पासपोर्ट फोटो आणि राहण्याचा पुरवा द्यावा गालेल. किती करु शकता गुंतवणूक - 👉पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत सिंगल आणि जॉईंट असे दोन्ही प्रकारची खाती उघडू शकतो. सिंगल खात्यामध्ये जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतो. तर जॉईंट खात्यामध्ये ९ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकतो. महिन्याला किती मिळणार पैसे ? 👉केंद्र सरकारनं पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) ६.६ टक्के व्याजदर ठरवला आहे. समजा, या योजनेअंतर्गत तुम्ही जॉईंट खात्यावर ९ लाख रुपये जमा केले आहेत. ६.६ टक्केंच्या व्याजदरासह तुम्हाला वार्षिक व्याज ५९ हजार ४०० रुपये मिळतील. म्हणजेच महिन्याला जवळपास ४९५० रुपये मिळणार आहेत. तसेच जर सिंगल खात्यात साडेचार लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला महिन्याला २४७५ रुपये मिळतील. संदर्भ - सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
50
16