AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
पोक्रा योजनेच्या पहिल्या टप्प्याची आवराआवर सुरू!
👉🏻राज्यात राबवण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याचे काम संपुष्टात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम केले जात असून 30 जूनला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम समाप्त होत आहे. प्रकल्पातील कंत्राटी मनुषबळाची सेवाही संपुष्टात येणार आहे. 👉🏻राज्यात विदर्भ-मराठवाड्यातील 16 जिल्ह्यात शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि शेतीपूरक व्यवसाय किफायतशीर करण्याच्या उद्देशाने जागतिक बँकेच्या अर्थसहायाने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. 👉🏻सहा वर्षांसाठी हा प्रकल्प सुरुवातीला जाहीर झाला. आता पोकरा 0.2 ची अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्पा समाप्तीच्या अनुषगांने आवराआवर सुरू आहे. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख