सल्लागार लेखकृषी जागरण
पॉलीहाऊसमधील संरक्षित शेती
पॉलीहाऊस म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली संरक्षित शेती. ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वातावरणातील तापमान ,आर्द्रता नियंत्रित ठेवून इतर हंगामामध्ये सुद्धा पिकांचे जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येते त्यालाच ‘पॉलीहाऊस’ म्हणतात. • पॉलीहाऊस हा एक प्रकारचा हरितगृह आहे. जेथे पॉलिथिलीनचा वापर कव्हर म्हणून केला जातो. • भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, पॉलिहाऊस शेती ही एक लोकप्रिय हरितगृह तंत्रज्ञान आहे. पॉलीहाऊस कमी किंमतीत उभारणी केली जाते तसेच सुलभ देखभाल सुद्धा करता येते. • पॉलीहाऊस म्हणजे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येते. • लॅथ हाऊस एक ग्रीनहाऊस तंत्रज्ञान आहे. जेथे लाकडापासून कव्हर म्हणून हरीतगृहात वापर केला जातो. • पॉली हाऊस उभारणी कमी खर्चामध्येसुद्धा करता येते. • शासनामार्फत हरित गृह उभारणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते
पॉलीहाऊसमध्ये घेतली जाणारी पिके: • पॉली हाऊसमध्ये काकडी , स्ट्रॉबेरी व भाजीपाला यांसारखी पिके घेतली जाऊ शकतात. उदा. कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर,ढोबळी मिरची, टोमॅटो इत्यादी पिके . • कार्नेशन, जरबेरा , झेंडू ऑर्किड व गुलाब यांसारखे फुलेदेखील सहज पॉली हाऊसमध्ये घेऊ शकता येते . संदर्भ – कृषी जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
479
0
संबंधित लेख