AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पैसे गुंतवणूकीसाठी योग्य सल्ला पहा.
कृषि वार्ताTV9 Marathi
पैसे गुंतवणूकीसाठी योग्य सल्ला पहा.
➡️ गुंतवणूक केल्यानंतर पैसे झटपट दुप्पट व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. जर तुम्हालाही पैसे गुंतवायचे असतील, तर तुमच्याही मनात ते नेमके कुठे गुंतवावे, कुठे ते सुरक्षित राहतील, कुठे गुंतवणूक केल्यानंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, असे अनेक प्रश्न तुम्हाला त्रास देतात. मात्र सद्यस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे योग्य ठरते की बँक एफडीमध्ये याबद्दलचा गोंधळ दूर करणार आहोत. किसान विकास पत्रमध्ये काय खास? ➡️ किसान विकास पत्र हे सर्वाधिक व्याज देणार्‍या गुंतवणूकीमध्ये गणले जाते. त्यामुळे आता त्यात बरेच लोक गुंतवणूक करत आहेत. किसान विकास पत्रातील (KVP) गुंतवणूकीमुळे 6.9 टक्के व्याज मिळते. जो इतर कोणत्याही बँकेच्या तुलनेतील एफडीवर मिळालेल्या व्याजापेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे यात आपण 1000 रुपयांनी गुंतवून गुंतवणुकीस सुरुवात करु शकता. तर जास्तीत जास्त तुम्हाला यात कितीही गुंतवणूक करता येते. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक यात गुंतवणूक करु शकतात. तर अडीच वर्षांनंतर तुम्हाला यातून पैसे काढता येतात. SBI Fixed Deposit काय खास? ➡️ देशातील सर्वात मोठी बँक SBI Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 5.40 टक्के व्याज देते. या दोघांच्या व्याजदरात खूप मोठा फरक आहे. आपण एसबीआयमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांसाठी एफडी करू शकता. या कालावधीच्या आधारे बँक तुम्हाला त्यावर 2.9 ते 5.4 टक्के व्याज देते. पण 5 वर्ष गुंतवणूक केल्यास सर्वाधिक व्याज मिळते. यामध्येसुद्धा आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे. कुठे होतील पैसे लवकरच दुप्पट... ➡️ किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूकीवर जास्तीत जास्त व्याज 6.90 टक्के आणि एसबीआय एफडीमध्ये जास्तीत जास्त व्याज 5.40 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही नियम क्रमांक 72 नुसार केव्हीपीमध्ये पैसे गुंतवले तर पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला 10 वर्षे 4 महिने लागतील. तर दुसरीकडे याच नियमानुसार, तुम्ही एसबीआयमध्ये गुंतवणू केली तर पैसे दुप्प्ट होण्यासाठी 13 वर्ष 4 महिन्यांचा अवधी लागेल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
4
इतर लेख