AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पॅन व आधार कार्ड लिंक मुदत वाढ!
समाचारAgrostar
पॅन व आधार कार्ड लिंक मुदत वाढ!
➡️केंद्र सरकारने सतत आवाहन करुनही अद्याप २० टक्के नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाकडून ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करायची अंतिम तारीख देण्यात आली होती.परंतु आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक करायचे आहे त्यांना दिलासा मिळाला आहे. ➡️पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत शासनाकडून ३० जून २०२३ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाकडून आधारशी पॅन लिंक करण्याची तारीख वाढवण्याच्या निर्णयानंतर स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, जर ३० जून २०२३ पर्यंत कार्ड लिंक केलं नाही तर त्यानंतर तुमचे कार्ड निष्क्रिय केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही.. सध्याच्या काळात पॅन कार्ड हे सर्वात महत्‍त्‍वाचे दस्ताऐवज बनले आहे, जे तुमच्‍या आर्थिक कामासाठी खूप महत्‍त्‍वाचे आहे. ➡️बंद कार्डचा वापर महागात पडणार – पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर, तुम्ही कोणत्याही आर्थिक कामासाठी त्याचा वापर केल्यास तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272B अन्वये ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ३० जून २०२३ पर्यंत तुम्ही १०० रुपये दंड भरून तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता. ➡️ऑनलाइन पद्धतीने आधार-पॅन लिंक कसे करावे? आधार-पॅन लिंकिंग करण्याआधी इनकम टॅक्स विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. तेथे व्यवस्थितपणे योग्य माहिती भरावी आणि लॉग इन करावे. जर असे करणे शक्य होत नसेल, तर पॅन नंबरच्या मदतीने नवीन अकाउंट तयार करावे. लॉन-इन करताना यूजर आयडीमध्ये पॅन नंबरचा वापर करावा. अशाच प्रकारे आधार कार्डसाठीच्या utiitsl.com / egov-nsdl.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही अकाउंट लिंक करणे शक्य आहे. ➡️संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
12
इतर लेख