AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पॅक हाऊस बांधण्यासाठी अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
पॅक हाऊस बांधण्यासाठी अनुदान!
➡️राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना ही केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे. ही योजना फलोत्पादन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. फलोउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. ➡️या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पतींची पिके त्याचबरोबर काही फळ पिके यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 30 ते 50 मीटर टन प्रतिवर्षी या क्षमतेच्या पॅक हाऊसची उभारणी करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. पॅक हाऊस ही अशी सुविधा आहे ज्यामध्ये फळे आणि भाज्यांची साफसफाई केली जाते त्याचबरोबर प्रतवारी केली जाते आणि विपणनासाठी पॅक केली जाते शेतकऱ्यांना पॅक हाऊस बांधण्यासाठी जवळपास सरकार 50 टक्के अनुदान देत आहे. म्हणजेच थोडक्यात शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत अनुदान सरकार देत आहे. ➡️पॅकिंग हाऊस बांधण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास चार लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चापैकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी तीन लाख खर्च ग्राह्य धरण्यात येतो. त्याचबरोबर इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक लाख भांडवल खर्च ग्राह्य धरण्यात येतो. असा सर्व मिळून चार लाख रुपयापर्यंत खर्च शेतकऱ्यांना येतो. ➡️यामध्ये सरकार 50% अनुदान देते म्हणजे दोन लाख रुपये सरकार देते आणि दोन लाख रुपये शेतकऱ्यांना गुंतवावे लागतात. ➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व्यावसायिक प्रमाणात फळे किंवा भाज्यांची लागवड करत असावे. त्याचबरोबर शेतकऱ्याकडे किमान ०.५ एकर जमीन असणे आवश्यक आहे. आणि शेतकऱ्याचे बँकेमध्ये खाते देखील असणे आवश्यक आहे. ➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: १. जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांची प्रत. २. बँक खात्याच्या विवरणाची प्रत. ३. पॅक हाऊसच्या बांधकामाचा प्रकल्प प्रस्ताव. ➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराना https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
10
इतर लेख