AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुन्हा झोडपणार पाऊस!
कृषी वार्ताNews 18 lokmat
पुन्हा झोडपणार पाऊस!
👉🏻मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. काल रात्रभर धुव्वाधार पाऊस झाल्यानं मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचलं आहे. आजही मुंबईकरांना पावसानं उसंत दिली नाही. आज मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज राज्यातील नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 👉🏻आज मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, ठाणे, पालघर आणि सातारा या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. 👉🏻सुधारित माहितीनुसार, आज सकाळपासूनच अरबी समुद्रातील काही भागासह मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत आकाशात ढगांची मोठ्या प्रमाणात दाटी नोंदली गेली आहे. तर पुणे परिसरातही आज दुपारपासून जोरदार पावसाचे ढग जमत आहेत. याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी नभ भरून आलं आहे. त्यामुळे आज राज्यात उत्तर महाराष्ट्रातील काही भाग वगळता अन्य ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस 👉🏻मागील तीन दिवसांपासून मुंबईला पावसानं चागलंचं झोडपून काढलं आहे. यानंतर आता मुंबईसह पुण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील आणखी पाच दिवस मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
2
इतर लेख