AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुन्हा अवकाळीचं संकट; पुढील २ दिवस पावसाचा इशारा!
मौसम की जानकारीABP Live
पुन्हा अवकाळीचं संकट; पुढील २ दिवस पावसाचा इशारा!
➡️ राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावत आहेत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ➡️ ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललं आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ➡️ जागतिक स्तरावर ला निनो ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराचं तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ➡️ नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यातही राज्यात अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. याच बदलत्या हवामानामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २३ आणि २४ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ➡️ दरम्यान, आधीपासूनच अवकाळीनं राज्याची चिंता वाढवली आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे. संदर्भ:- ABPLive, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
8
इतर लेख