AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुणे महापालिकेत 450 हून अधिक पदांसाठी भरती, करा अर्ज !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
पुणे महापालिकेत 450 हून अधिक पदांसाठी भरती, करा अर्ज !
👉🏻सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. पुणे महानगरपालिका (PMC) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 448 रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलै 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. 👉🏻महत्त्वाच्या तारखा : 👉🏻ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 20 जुलै 2022 👉🏻ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022 👉🏻रिक्त जागांचा तपशील : 👉🏻असिस्टंट लीगल ऑफिसर : 04 👉🏻क्लर्क टायपिस्ट : 200 👉🏻ज्युनिअर इंजीनियर (सिव्हिल) : 135 पदं 👉🏻ज्युनिअर इंजीनियर (मॅकेनिकल) : 05 पदं 👉🏻ज्युनिअर इंजीनियर (ट्रॅफिक प्लानिंग) : 04 पदं 👉🏻असिस्टंट एनकॉर्चमेंट इंस्पेक्ट : 100 👉🏻भरतीसाठीची वयोमर्यादा : पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावं. 👉🏻अर्ज शुल्क : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. 👉🏻निवड प्रक्रिया : या पदांवरील निवड लेखी चाचणी, मुलाखत, टायपिंग चाचणी, कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे केली जाईल. या पोस्ट्सबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
9
इतर लेख