AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढील दोन दिवस राज्यात पाऊसाचा अंदाज!
हवामान अपडेटkrishi jagran
पुढील दोन दिवस राज्यात पाऊसाचा अंदाज!
➡️मागील काही दिवसांपासून अचानकपणे म्हणजे अनियमितपणे पाऊस आपली हजेरी लावत आहे त्यामुळे वातावरणात सतत यामुळे बदल होत निघाला आहे. कालच्या रविवार पर्यंत सर्वत्र पावसाळी वातावरण झाले होते पण सोमवार पासून शहरात वातावरणात कोरडेपणा निर्माण झालेला आहे. ➡️आज शहरात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊसाच्या हलक्या सरींची हजेरी लागणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामानाने वर्तवलेली आहे. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पाऊसामुळे आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी लागणार असल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुढील काही दिवस थंडी आणि गरमी अनुभवायला भेटणार:- ➡️सध्या उन्हाळा ऋतू चालू होण्याच्या आधीच गरमीमध्ये वाढ झालेली आहे मात्र रात्री आणि पहाटे च्या वेळी थंडी जाणवत आहे. तसेच आज पहाटे धुके पडले आहे. ➡️शहरातील तापमानात सतत वाढ होत असल्याने अजून पुढचे काही दिवस वातावरणात थंडी तसेच गरमी सुद्धा अनुभवायला भेटणार आहे. संदर्भ:- krishi jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
0
इतर लेख