AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढील २ दिवस राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
पुढील २ दिवस राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता!
➡️ महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून झाली असून आर्वी समुद्रावर ढगांची दाटी झालेली आहे.या शिवाय बंगालचा उपसागराचे मध्य भागापासून उत्तरेकडील भागापर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.यामुळे १८ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. कोकण : उद्या म्हणजे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६७ मी. मी. रत्नागिरी ७५ मी.मी., रायगड जिल्ह्यात ५७ मी. मी.व ठाणे जिल्ह्यात ४० मी मी पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोमवारी ५० मी. मी .पावसाची शक्यता आहे.त्यापुढेही कोकणात दररोज पाऊस होणे शक्य आहे. उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, व जळगाव जिल्ह्यात उद्या म्हणजे रविवारी २३ ते २४ मी. मी पावसाची शक्यता असून नंदुरबार जिल्ह्यात १४ मी. मी. पावसाची शक्यता आहे. मात्र सोमवारी या सर्वच जिल्ह्यात १८ ते २२ मी. मी . पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभाग: रविवारी म्हणजे उद्या दि. १२ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ५ ते ७ मी. मी. पावसाची शक्यता आहे. तर नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात १० ते १५ मी. मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी १३ सप्टेंबर ७ ते ८ मी. मी. पावसाची शक्यता आहे. तर लातूर , नांदेड, परभणी , हिंगोली ,जालना या जिल्ह्यात १३ मी. मी. पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ : रविवारी म्हणजे उद्या १२ सप्टेंबर रोजी अकोला व अमरावती जिल्ह्यात २६ ते ३२ मी.मी. पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात १० ते ११ मी. मी पावसाची शक्यता आहे. मात्र सोमवारी सर्वच जिल्ह्यात १४ ते २० मी. मी पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भ : रविवारी म्हणजे उद्या १० ते १२ मी.मी. व सोमवारी दिनांक १३ सप्टेंबर रोजी २४ ते २७ मी. मी. पावसाची शक्यता यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात राहील. पूर्व विदर्भ : चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात रविवारी ६ ते १२ मी. मी पावसाची शक्यता आहे.व गोंदिया जिल्ह्यात ३ मी.मी. पावसाची शक्यता आहे.मात्र सोमवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १९ मी. मी पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र : रविवारी दि. १२ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात ६४ मी.मी. व सोमवारी ३९ मी. मी.पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित सांगली , सातारा, सोलापूर,पुणे व अहमदनगर जिल्हात ११ मी.मी. पावसाची शक्यता आहे. व सोमवारी ६ ते ११ मी. मी पावसाची शक्यता आहे. कृषी सल्ला- ➡️ सप्टेंबर महिन्यात , मूंग, मटकी, उडीद, चावली हि पिके परीप्कव होताच काढणी करून मळणी करावी. ➡️ भात खाचरात ५ ते १० सेमी पाणी पातळी ठेवावी. ➡️ करडई पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
97
16
इतर लेख