हवामान अपडेटसंदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
पुढील २ दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता!
➡️ महाराष्ट्रावरील उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब ३० सप्टेंबर २०२१ पर्यन्त कायम राहणे शक्य असून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पावसाचा जोर कायम राहील व तीच परिस्थिती गुरुवार पर्यन्त कायम राहील.
➡️ कोकण - ठाणे व रायगड जिल्ह्यात रविवारी ४० ते ४६ मी.मी .पावसाची शक्यता आहे तर सोमवारी २० ते २१ मी.मी पावसाची शक्यता आहे.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी १५ ते १६ मी.मी पावसाची शक्यता असून सोमवारी ७ते ९ मी.मी पावसाची शक्यता आहे.
➡️ उत्तर महाराष्ट्र - नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात रविवारी प्रत्येकी ५२ व ३० मिमी तर सोमवारी ६१ व ३० मिमी असून नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील व पावसाची कमतरता भरून निघेल.नाशिक व धुळे जिल्ह्यात रविवारी २२ ते २८ मी मी व सोमवारी ३० ते ३१ मी मी पावसाची शक्यता आहे.
➡️ मराठवाडा - रविवारी नांदेड, बीड, परभणी, व हिंगोली जिल्ह्यात २२ ते २४ मी.मी पावसाची शक्यता आहे. तर उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १५ मी.मी व जालना, औरंगाबाद जिल्ह्यात १६ ते १७ मी.मी पावसाची शक्यता आहे. सोमवारी नांदेड जिल्ह्यात २७ मी .मी व हिंगोली व जालना जिल्ह्यात २१ ते २२ मी.मी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात १३ मी.मी तसेच लातूर व परभणी जिल्ह्यात १७ ते १८ मी.मी पावसाची शक्यता आहे.
➡️ पश्चिम विदर्भ - बुलढाणा जिल्ह्यात रविवारी ३८ मी.मी अकोला व अमरावती जिल्ह्यात ४८ मी.मी व वाशीम जिल्ह्यात १५ मी.मी पावसाची शक्यता असून सोमवारी २५ ते ३० मी मी पावसाची शक्यता या सर जिल्ह्यात आहे.
➡️ मध्य विदर्भ - यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात रविवारी २४ ते ३० मी. मी पावसाची शक्यता असून सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात ३० मी.मी तसेच नागपूर व वर्धा जिल्ह्यात ११ ते १४ मी.मी पावसाची शक्यता आहे.
➡️ पूर्व विदर्भ - रविवारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २० ते २४ मी.मी पावसाची शक्यता असून सोमवारी २६ ते ३० मी.मी पावसाची शक्यता आहे.तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रविवारी ४० मी.मी पावसाची शक्यता असून सोमवारी ३६ मी.मी पावसाची शक्यता आहे.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - रविवारी पुरणे व नगर जिल्ह्यात ४८ मी.मी पावसाची शक्यता आहे.तर उर्वरित कोल्हापूर, सांगली सातारा व सोलापूर जिल्ह्यात १३ ते १५ मी.मी पावसाची शक्यता आहे. सोमवारी सर्वच जिल्ह्यात ८ ते २० मी.मी पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला -
१) करडई पेरणी सप्टेंबर महिन्याचे अखेरीस करावी.पेरणी नंतर सऱ्या व पाट पाडावेत.
२) रब्बी ज्वारीची पेरणी करण्यास हवामान अनुकूल असून योग्य ओळीवर पेरणी करून सऱ्या व पाट पाडावेत
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.