AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये पाऊस धो धो कोसळणार !
हवामान अपडेटAgrostar
पुढील ३ दिवस या राज्यांमध्ये पाऊस धो धो कोसळणार !
🌧️सध्या देशात सर्वत्र मान्सूनचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक भागात संततधार सुरूच आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे लाखो हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 🌧️हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, अनेक राज्यांमध्ये 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. या संदर्भात आयएमडी अलर्टही जारी करण्यात आला आहे.बाधित भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🌧️बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे १० ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमध्ये मच्छिमारांना 11 ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🌧️आजपासून पुढील दोन-तीन दिवस उत्तर प्रदेशातील अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने छत्तीसगड, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात ९ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.दुसरीकडे, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश आणि सौराष्ट्रमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 🌧️स्कायमेट वेदर या खाजगी हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेट वेदरचे हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत यांच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा प्रवाह या दिवसांत मध्य भारतात पोहोचला आहे. त्यामुळे उत्तर भारतात सध्या पावसाची शक्यता कमी आहे. 🌧️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
3
इतर लेख