AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस!
हवामान अपडेटन्यूज १८ लोकमत
पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह पाऊस!
➡️ राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले असून काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने पावसाळी वातावरण राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ➡️ हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ➡️ त्याचप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याचा अंदाज असून इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस ➡️ समुद्रकिनारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
11
इतर लेख