कृषी वार्ताTV9marathi
पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?
➡️ राज्याच्या अनेक भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळालं. मात्र आता पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे.
➡️ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
➡️ ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस बरल्यानंतर आता पुन्हा पाऊस दडी मारण्याची चिन्हे आहेत. मागील चार ते पाच दिवस राज्याच्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, मात्र काही शहरं आणखीही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत..
➡️ पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. मात्र जिथे हलक्या पावसाचा अंदाज आहे, त्या भागांत ढगाळ वातावरण राहिल. परंतु आठवडाभर चांगलं कमबॅक केलेला पाऊस आता चार ते पाच दिवसांसाठी ब्रेक घेणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय.
सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं कमबॅक होणार
➡️ राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पाऊस असेल पण पावसाचे प्रमाण कमी असेल. पाऊस पडले पण हलका ते मध्यम स्वरुपाचा असेल. पाऊस नसण्याची परिस्थिती सर्वसाधारण दहा दिवस असेल, असं भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी सांगितले.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-TV9 marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.