AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
हवामान अपडेटtv9marathi
पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
➡️गेल्या वर्षभरामध्ये वारंवार होणारे हवामानातील बदल आपण सगळ्यांनीच पाहिले. आताही हवामान खात्याच्या अंदाजामुळे बळीराजाच्या धाकधूक आणखी वाढली आहे. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ➡️राज्यात ६ ते ७ जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या ३ ते ४ दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे. ➡️आताही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे अवकाळी पावसामुळे कांदा शेतकऱ्यांचं नुकसान ➡️सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहे.तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच औषधांचा वापर करावा. संदर्भ:- TV9Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
95
11
इतर लेख