AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पी .एम. मुद्रा योजना !
योजना व अनुदानAgrostar
पी .एम. मुद्रा योजना !
➡️छोटे व्यावसायिक, विक्रेते, कृषी क्षेत्रामध्ये सेवा पुरवठादार यांच्या नव्या व्यवसाय उभारणीसाठी पंतप्रधान मुद्रा योजना उपयोगी ठरते.पुरेसे भांडवल उपलब्ध नसलेल्या व्यक्तींना त्यांचा उद्योग, व्यवसायाच्या उभारणीसाठी किंवा विकासासाठी कर्जपुरवठा करणे. ➡️मुद्रा योजना कोणासाठी :- ग्रामीण व शहरी छोटे व्यावसायिक, प्रोप्रायटर किंवा भागीदारी किंवा उत्पादक फर्म, लहान दुकानदार, भाजी विक्रेते, ट्रकचालक, खाद्य पदार्थ सेवा देणारे, विविध वस्तूंची दुरुस्ती करणारे, यंत्रचालक, लघू उद्योग, बलुतेदार, अन्न व खाद्यपदार्थ बनविणारे कृषिपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, ॲग्रो क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर, अन्न व कृषी प्रक्रिया, वितरक, किरकोळ व्यापारी, वाहतूकचालक, विविध कंपन्यांना छोट्या मोठ्या सेवा पुरवणारे अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांना त्यांच्या नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. ➡️कशा प्रकारे व किती कर्ज मिळू शकते : मुदत कर्ज किंवा खेळते भांडवल कमाल रु. १० लाख. ➡️कर्जाचे तीन प्रकार : शिशू : रु. ५०,००० पर्यंत किशोर : रु. ५०,००० पेक्षा जास्त व रु. ५ लाख पर्यंत तरुण : रु. ५ लाखांपेक्षा जास्त व रु. १० लाखांपर्यंत. ➡️कर्जदाराची स्वत:ची रक्कम किंवा भांडवल : शिशू : काही नाही किशोर : १५%, तरुण : १५% ➡️परतफेड कालावधी : अल्प मुदतीसाठी : कमाल ३६ महिने. मुदतीचे कर्ज : कमाल ८४ महिने. तारण : कर्जातून निर्माण झालेले घटक बँकेकडे तारण राहतात. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही अतिरिक्त तारण लागत नाही. व्याज दर :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया / बँक यांच्या नियमानुसार. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
18
इतर लेख