AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पी एम जन धन खातेसंबंधित माहिती तपासा आता एका मिस कॉलवर!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत,
पी एम जन धन खातेसंबंधित माहिती तपासा आता एका मिस कॉलवर!
➡️ पंतप्रधान जनधन योजनेंअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. हे बँक खातं झिरो बॅलेन्स बचत खातं असतं. त्याशिवाय यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा मिळतात. जर तुम्हीही जनधन खातं ओपन केलं असेल, तर तुम्ही घर बसल्या केवळ एका मिस्ड कॉलद्वारे आपला बॅलेन्स चेक करू शकता. जनधन खात्यातील बॅलेन्स दोन पद्धतींनी तपासता येऊ शकतो. PFMS पोर्टल - ➡️ PFMS पोर्टलद्वारे बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वात आधी https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जावं लागेल. इथे ‘Know Your Payment’ वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर एंटर करावा. इथे दोन वेळा अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. आता खात्याचा बॅलेन्स समोर दिसू शकेल. मिस्ड कॉल - ➡️ जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. त्यासाठी 18004253800 या किंवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्वावा लागेल. ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मिस्ड कॉल द्वावा लागेल. ➡️ देशातले सगळे नागरिक बँकिंग यंत्रणेशी जोडले जावेत, या उद्देशाने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 42.37 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेत (PMJDY) अगदी गरिबातली गरीब व्यक्तीही खातं उघडू शकते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4
इतर लेख