कृषी वार्तान्यूज १८लोकमत
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी आता रेशन कार्ड आवश्यक!
➡️शेतकऱ्यांच्या कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक साहाय्य मिळावं याकरता सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा २००० रुपयांचा हप्ता मिळेल. अर्थात या योजनेच्या नोंदणीसाठी आता रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत सध्या बदल करण्यात आले आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा बदल आहे. आता रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह इतर कागदपत्रांची सॉफ्टकॉपी पोर्टलवर अपलोड करता येईल. कागदपत्रांची हार्डकॉपी सबमिट करणे आवश्यक नाही ➡️पीएम किसान योजनेसाठी नोंदणीच्या नवीन प्रणाली अंतर्गत, यापुढे रेशन कार्ड क्रमांकाशिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही. या व्यतिरिक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घरबसल्या करा नोंदणी ➡️याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. ➡️त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता. ➡️याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका ➡️कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल ➡️तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल -ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
21
इतर लेख