AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत!
कृषी वार्ताTV9 Marathi
पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपयांची आर्थिक मदत!
➡️ पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्याचा कालावधी बुधवारी संपुष्टात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ पदरात पाडून घ्यायचा असल्यास आजच्या दिवसात नोंदणी करावी लागेल. यानंतर त्यांचा अर्ज स्वीकारला गेल्यास केंद्र सरकार थेट शेतकऱ्याच्या (Farmers) बँक खात्यामध्ये पैसे जमा करेल. ➡️ गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आता नोंदणी करुन शेतकरी दोन्ही हप्ते मिळवू शकतात. त्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील. रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल? 1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. 2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा. 3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल. 4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा. 5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा. 6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. आर्थिक मदत कधी मिळणार? एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
10
इतर लेख