AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक विमा साठी हे कागदपत्र आवश्यक!
कृषी वार्ताAgrostar
पीक विमा साठी हे कागदपत्र आवश्यक!
➡️ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह इतर राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. यामुळे खरीप पिके आणि रब्बी पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. पिकांची भरपाई कशी मिळणार? या सर्वासाठी मदतीची ठरेल पीएम फसल बिमा किसान योजना. तर जाणून घेऊया याबद्दल. ➡️पीएम फसल बीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यंत कमी निश्चित प्रीमियम भरावा लागतो. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी कमाल 5% भरावे लागतात. उर्वरित प्रीमियमची रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरेल. ➡️तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही पीएम फसल विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. दुसरीकडे, ऑफलाइन अर्जासाठी, शेतकरी जवळच्या बँक, सहकारी संस्था किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना हा विमा पेरणीनंतर 10 दिवसांच्या आत काढावा लागणार आहे. ➡️आवश्यक कागदपत्रे : 1.शिधापत्रिका 2.आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते 3.एक वैध ओळखपत्र 4.एक पासपोर्ट आकाराचा फोटो 5.शेत खसरा क्रमांक 6.रहिवासी पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इ.) 7.जर शेत भाड्यावर असेल तर शेत मालकाचे संमतीपत्र ➡️पाऊस, पूर किंवा अन्य आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवा. विमा कंपनी सर्वेक्षण करून पिकावर आपत्तीचा किती परिणाम झाला हे पाहणार आहे. मूल्यांकनानंतर, अहवाल तयार केला जाईल आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पैसे तुमच्या खात्यात पाठवले जातील. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
इतर लेख