समाचारPrabhudeva GR & sheti yojana
पीक विमा योजनेत ७२ तासाची अट
🌱पीक विमा योजनेत मागील वर्षी बरेच शेतकरी पीक काढणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीच्या भरपाईस अपात्र ठरेल. यंदादेखील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यासंबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून देणार आहोत.
🌱अ ) नुकसानीचा अहवाल सादर करण्याची पद्धत आणि वेळापत्रक
१) वीमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित शेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस कळवणे आवश्यक राहील.
२) आवश्यकतेनुसार विमा हफ्ता भरण्याची पिक विमा पडताळणी पिक विमा बँकेकडून करता येईल.
३) कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या मोबाईल ॲपद्वारे स्थानिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त क्षेत्राचे छायाचित्र त्याच्या अशांश व रेखांश सहित घेऊन माहिती दिली जाऊ शकते.
🌱आ) पिक नुकसानीची माहिती कळवण्याची पद्धत :-
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्या पासून ७२ तासाच्या आत नुकसानी बाबतची सूचना संबंधित वीमा कंपनी, बँक महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक द्वारे देण्यात यावी.
पिक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोन वरील प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे देता येतील.याचबरोबर भारतीय हवामानाचे अहवाल ,प्रसार माध्यमातील बातम्या आदी.तपशील सहपत्रित करता येईल.
🌱संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.