गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पीक लागवडीसाठी व्हरायटीची निवड करताना या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे!
👉 पिकाची लागण कोणत्या हंगामात करायचे ते हंगाम निवडा, त्यानुसार अगोदरच तयारी सुरू करा. 👉 लागण दिनांक ठरवा त्यानुसार पुढील महिनाभराचा हवामान अंदाज बघा त्यावरून लागणीनंतर तापमान किती राहील, पावसाची शक्यता, आर्द्रता किती असेल यावरून त्या वातावरणात चांगली वाढ करणारे, फुल धारणा करणारे, फळधारणा करणारे, त्या वातावरणात तापमान,आर्द्रता व विविध वातावरणीय बदलांमुळे येणाऱ्या किडी व रोग यांचा त्या पिकावर होणारा परिणाम व त्या वाणाची त्या रोग व किडी विरुद्ध असणारी प्रतिकार शक्ती या सर्व गोष्टींचा विचार करून वाण निवडा. 👉 त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटचा विचार करा, तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये माल विक्रीस नेणार आहे, यावरून तो माल किती दूरच्या मार्केटला जाणार आहे हे समजते त्यावरून तेवढा वेळ माल टिकणारे वाण निवडा, त्यानंतर मागणी असणारी फळांचा आकार, रंग वजन या सर्व गोष्टींचा विचार करून वाण निवडा. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून वाण निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला घेतलेल्या पिकातून भरघोस उत्पादन मिळेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
6
इतर लेख