AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक लागवडीसाठी ७ लाख रुपये अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
पीक लागवडीसाठी ७ लाख रुपये अनुदान!
➡️राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बांबू पीक लागवडीकरिता 7 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. ➡️गेल्यावर्षी अर्थात 2023 मध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस राज्यामध्ये पाहायला मिळाला. यामुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनात मोठी घट झाली आहे.या सर्वांचा विचार करता हवामान बदलावर उपाय म्हणून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करावे लागणार आहे.यादरम्यान जर कार्बन विसर्जनाचे प्रमाण कमी करायचे असेल तर बांबू लागवड हा एक बेस्ट ऑप्शन ठरणार असल्याचा अंदाज पर्यावरणीय परिषदेत व्यक्त केला गेला. ➡️यामधून कार्यक्रमावेळी मुख्यमंत्रीनी माहिती देत सांगितले की बाबू लागवड हा हवामान बदलावर योग्य पर्याय ठरणार आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होणार आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी यासाठी शासनाकडून अनुदान देखील पुरवल्या जात आहे. बांबू लागवड ही उसाची शेती पेक्षा फायदेशीर असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. ➡️बांबू लागवडीमुळे अतिवृष्टी, ढगाळ हवामान,गारपीट, दुष्काळ यामुळे जे सर्वसामान्य पिकांचे नुकसान होते, हे देखील आपण टाळता येणार आहे. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
0
इतर लेख