AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक नुकसान भरपाई योजना, पात्रता निकष!
योजना व अनुदानAgrostar
पीक नुकसान भरपाई योजना, पात्रता निकष!
👉🏻 केंद्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा प्रदान केला आहे. जेणेकरून पूर , दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्यांना त्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही. पीक विमा नुकसान भरपाईच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थेर्य मिळत आहे, जेणेकरून काही नौसर्गिक दुर्घटनामुळे त्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा नव्याने शेतीची मशागत करण्यासाठी पुरेसा निधी मिळेल.ही योजना शेतकर्‍यांना आर्थिक दृष्टीने सर्वात मोठा दिलासा देणारी योजना आहे. 👉🏻 पिक विमा नुकसान भरपाई पात्रता निकष- - अर्जदार हा भारताचा शेतकरी असणे आवश्यक आहे. - अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. - योजनेसाठी वयोमर्यादा आवश्यक नाही. - अर्जदार दारिद्र्य रेषेखालील गटातील असणे आवश्यक आहे. - अर्जदाराचे जास्तीत जास्त उत्पन्न शेतीतून असणे आवश्यक आहे. 👉🏻 पिक विमा नुकसान भरपाई आवश्यक कागदपत्रे – - पासपोर्ट आकाराचे फोटो - आधार कार्ड - पॅन कार्ड - मतदार ओळखपत्र - किसान बँक पासबुक - बँकेचा तपशील - उत्पन्न प्रमाणपत्र - जमीन कागदपत्रे ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र - महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख