AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक काढणीसाठी स्वस्त मशीन !
कृषी यांत्रिकीकरणAgrostar
पीक काढणीसाठी स्वस्त मशीन !
👉🏻शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र पिकांच्या कापणीवेळी शेतकऱ्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. खरीप हंगामातील मुख्य पीक भात पीक आहे. त्यामुळे आज आपण भात पिकाच्या कापणीच्या मशीनबद्दल माहिती जाणून घेऊया.भात पिकाच्या मशीनबद्दल सांगायचे झाले तर या मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहे. 👉🏻कम्बाइंड हार्वेस्टर मशिन हा पिकांच्या काढणीसाठी उत्तम पर्याय आहे. या यंत्राच्या सहाय्याने भात कापणी उत्तम प्रकारे करता येते आणि शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचतात. विशेष म्हणजे हरभरा, सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन, गहू या पिकांची काढणी देखील करता येते. महत्वाचे म्हणजे शेत साफसफाईसाठीही याचा वापर करता येईल. 👉🏻कडधान्य, हरभरा, सोयाबीन यासारख्या लहान पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांनाही तोटा सहन करावा लागतो. मात्र आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. ही समस्या मिटविण्यासाठी बाजारात एक शॉर्टी मशीन आहे. ज्याला रीपर मशीन देखील म्हणता येईल. 👉🏻ही मशिन लहान रोपेही सहज कापते. या मशीनमध्ये 50 सीसी 4 स्ट्रोक इंजिन आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले स्थापित केला आहे, जे काम कसे करायचे याची माहिती देते. हे मशीन शेतकऱ्यांना फक्त 30 हजार रुपयांमध्ये मिळेल, यामध्ये 1 वर्षाची वॉरंटीदेखील आहे. 👉🏻संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
13
इतर लेख