AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक कर्ज विमा योजना नसतानाही बँकांकडून मिळेल मदत, यासाठी हे करावे लागेल!
कृषी वार्ताAgrostar
पीक कर्ज विमा योजना नसतानाही बँकांकडून मिळेल मदत, यासाठी हे करावे लागेल!
• अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जाते. यामुळे शेतकर्‍यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तथापि, या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरपाई दिली जाते. परंतु शेतकऱ्यांना हे ठाऊक आहे काय की, ते पीएम पीक विमा योजनेशी जोडलेले नसले तरी पीक नुकसानात बँकांकडून मोठी मदत मिळू शकते. • वृत्तांच्या माध्यमानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भात माहिती दिली आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, जर शेतकऱ्यांच्या पिकाच्या ३३ टक्केपेक्षा जास्त पीक वाया गेले तर ज्या बँकेकडून शेतकऱ्याने कर्ज घेतलेले आहे त्या बँकेत सदर माहिती दिल्यास बँकेमार्फत दिलासा मिळू शकेल.  पीक उध्वस्त झाल्यास काय करावे:- • शेतकऱ्यांना बँकांना हे सांगावे लागेल की, त्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पीक तोटा झाला आहे. हे स्पष्ट करा की, नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंप, हिमस्खलन, भूस्खलन, दुष्काळ, वादळ, पूर, जाळपोळ, ढगफुटी, पीक अळी आणि शीतलहरीच्या हालचाली इ. कारणांमुळे पिकाचे नुकसान झाले आहे.  जाणून घ्या, काय दिलासा मिळेल? • जर शेतकऱ्याने ३३ ते ५० टक्के पीक गमावले असतील तर कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला २ वर्षांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. या प्रकरणात, आपल्या अल्प मुदतीच्या कर्जाचे रुपांतर बँकेने टर्म कर्जात केले आहे. याअंतर्गत, २ वर्षांपैकी पहिल्या वर्षासाठी कोणताही हप्ता भरला जाणार नाही. जर पिकाचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले तर ५ वर्षापर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्याला दिलासा मिळू शकेल. तसेच त्यामध्ये एक वर्षाचे अधिग्रहण देखील आहे.  नुकसानीची माहिती देणे हि मह्व्ताची बाब • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची संपूर्ण माहिती बँकेला दिली तेव्हाच त्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्याने तसे न केल्यास तो या लाभापासून वंचित राहील. रिझर्व्ह बँकेच्या मते पीक नुकसानीसंदर्भात बँकेला माहिती देणे ही शेतकऱ्याची पहिली जबाबदारी आहे. तरच संबंधित बँक शेतकऱ्याला मदत करू शकेल. संदर्भ:- कृषी जागरण, ८ मे २०२० हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
459
0
इतर लेख