AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीक कर्जाला सिबील स्कोरची सक्ती नाही!
समाचारAgroStar
पीक कर्जाला सिबील स्कोरची सक्ती नाही!
👉🏻पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 👉🏻संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झाला असून अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर लावल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी बँकर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात केले. 👉🏻पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे,असा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन 2024-25 साठीच्या 41 लाख 286 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत, असे निर्देशही देण्यात आले. 👉🏻संदर्भ :AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
0
इतर लेख