योजना व अनुदानTV9 Marathi
पीकांच्या विम्याची प्रत्येक शेतऱ्यासाठी महत्वाची बातमी!
➡️ शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरण्याची लगबग सुरु आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांच्या विम्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. शिवाय यामध्ये वाढही होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. ➡️ वातावरणातील बदलामुळे पिक विमा काढणे ही काळाची गरज झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाले तरी या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ही मिळत असते. पण कोणत्या पिकासाठी किती प्रीमियम भरावा लागणार आहे याची माहिती आपणास अधिकाऱ्याने सांगितल्यावरच होते. ➡️ पण तुम्हालाही या अदा कराव्या लागणाऱ्या रकमेची माहिती आम्ही सांगणार आहोत त्यामुळे विम्यासंदर्भातला अचूक अंदाज येणार आहे. चला तर मग पाहू या की कोणत्या पिकाला किती प्रीमियम भरावा लागणार आहे तो… अशी आहे प्रक्रिया.. ➡️ रब्बी हंगामातील कोणत्या पिकाला किती प्रीमियम भरावा लागणार आहे. ही पध्तत अगदी साधी सोपी आहे. एवढेच नाही तर त्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्ही किती दावा करू शकता. या सर्व महत्वाची माहिती आम्ही सांगणार आहोत. ➡️ या महत्वाच्या माहितीसाठी प्रथम योजनेच्या अधिकृत साइटला https://pmfby.gov.in/ भेट द्यावी लागणार आहे. त्यामध्ये वेगवेगळे पर्याय असून यामधला विमा प्रीमियम कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला हंगाम, वर्ष, योजना, राज्य, जिल्हा आणि पिकांची माहिती भरून क्लिक करा, तुमचा प्रीमियम आणि दाव्याची रक्कम उघड होईल. शेतकऱ्यांच्या वाटेला किती प्रीमियम? ➡️ बहुतेक पिकांवरील एकूण प्रीमियम शेतकऱ्यांना केवळ १.५ ते २ टक्के च दिला जाणार आहे. काही व्यावसायिक पिकांचा प्रीमियम फक्त ५ टक्के असल्याचे दिसते. उर्वरित प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे जमा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवरील भार कमी होतो शिवाय आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचा विमा काढणे हे महत्वाचे झाले आहे. ➡️ त्यामुळे कोणत्या पिकाला किती प्रीमियम भरायचा ही महत्वाची पध्दत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- TV9Marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
6
इतर लेख