AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीकविमा लवकरच येणार खात्यात
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
पीकविमा लवकरच येणार खात्यात
पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रू. विमा कंपन्याकडे अखेर वर्ग केले आहेत. त्यामुळे यंदा काही जिल्हयांमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. खरीप २०२१ हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. यासाठी राज्य शासनाने स्वत:चा विमा अनुदान हिस्सा यापूर्वीच जमा केला होता. त्यानंतर कंपन्यांनी केंद्राकडे अनुदान मागणी करणे आवश्यक होते. त्यात दिरंगाई सुरू असल्याचे पाहून कृषी विभागाने कंपन्यांकडेही जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्राकडे कंपन्यांनी अखेर अनुदान मागणी नोंदविली. ही नोंदणी पूर्ण होताच केंद्रानेदेखील अनुदान हिस्सा वर्ग केला. परिणामी, पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात विमा नुकसान भरपाईच्या रक्कमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
95
9
इतर लेख