समाचारन्यूज १८ लोकमत
पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत मिळणार पेन्शन!
➡️ देशातील गरीब वर्गात काम करणाऱ्या मजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे.
➡️ या योजनेंतर्गत मजूर, वीटभट्टी किंवा बांधकामावर काम करणारे कामगार, पादत्राणे बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धुलाई, रिक्षाचालक, जमीन नसलेले मजूर, विडी कामगार अशा इतर मजुरांना पेन्शन दिली जाते. यासोबतच त्या मजुरांचाही यात समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
➡️ केंद्र सरकारच्या या योजनेशी संबंधित व्यक्तीला वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते. दरम्यान, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतनाच्या ५० टक्के रक्कम पती-पत्नीला पेन्शन म्हणून दिली जाते.
➡️ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. या योजनेतील अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांना ६० वर्षापर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपये द्यावे लागतील. त्यांचे मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी असावे. वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल.
कोण अर्ज करू शकत?
➡️ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करणारे लोक संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी नसावेत. यासोबतच, कोणीही EPFO, NPS आणि ESIC चा सदस्य नसावा आणि करदाता नसावा.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट www.maandhan.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा. नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP वेरिफाय करा. त्यानंतर अॅप्लिकेशन पेज ओपन होईल. विचारलेली माहिती एंटर करा आणि सबमिट करा.
संदर्भ:-न्यूज १८ लोकमत ,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.