कृषि वार्ताअॅग्रोवन
‘पीएम शेतकरी सन्मान निधी’ योजनेचा दुसरा टप्पा सुरू
नवी दिल्ली – केंद्रशासनाने ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएम-किसान) योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यामधील योजनेचा चौथा हप्ता पाठविण्यात येत आहे. डिसेंबर 2018 मध्ये ही योजना जाहीर झाल्यानंतर दोन हजार रूपयांचे तीन हप्ते देण्यात आले आहे. चौथा हप्ताही 2 कोटी 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही शेतकऱ्यांच्या मनात या योजनेविषयी शंका निर्माण झाली की, एका वर्षातच ही योजना बंद होईन. मात्र शासनाने दुसऱ्या वर्षाचे ही पैसे पाठविले आहे, यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना पुढे ही मिळणार आहे.
केंद्र शासानाने 1 डिसेंबर 2018 ला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर केली. या योजनेत शेतकऱ्यांना कृषी निवष्ठांसाठी आर्थिक वर्षात दोन हजार रूपयांच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रूपये आर्थिक साहय देण्याची तरतूद करण्यात आली. शासनाने योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आधार कार्ड संलग्न नसल्यास चौथा हप्ता मिळणार नाही. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, 21 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1314
0
इतर लेख