कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पीएम-शेतकरी योजनेचा पहिला टप्पा ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार!
देशभरातील ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम-किसान) योजने अंर्तगत योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारीला जवळपास एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे एका शेतकरी रॅलीमध्ये औपचारिक पध्दतीने करणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीने दिली आहे. ते म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत दुसरा टप्पा १ एप्रिलपासून जमा करण्याची योजना आहे. राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा डाटा तयार करण्याचे काम जोरदारपणे चालू आहे. जवळपास बारा राज्यात ९५ टक्के डेटा तयार केला आहे, जेणेकरून ९ राज्यांनी ८० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीची नोंद केली आहे. त्याचबरोबर ज्या राज्यांच्या शेतकऱ्यांची माहिती २० फेब्रुवारीपर्यंत नोंद केली जाईल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातील, पण काही
राज्यात २४ फेब्रुवारीपर्यंत पोर्टलवर डाटा उपलब्ध होणार नाही असेदेखील वाटत आहे. पीएम-किसान योजने अंतर्गत पाच एकर शेतकऱ्यांपर्यंत लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयांचे तीन टप्पे दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी राज्यांना शेतकऱ्यांची यादी २४-२५ फेब्रुवारीपर्यंत अपलोड करण्यास सांगितले आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १४ फेब्रुवारी २०१९
13
0
इतर लेख