AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम जन-धन खात्यांच्या संख्येत तिप्पट वाढ!
समाचारTV9marathi
पीएम जन-धन खात्यांच्या संख्येत तिप्पट वाढ!
केंद्र सरकारच्या पीएम जन धन योजनेला सर्वसामान्यांनी चांगली पसंती दिलीय. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झालीय. 👉 जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. जन धन खातेदाराचा अपघात झाल्यास त्याला 30,000 रुपये दिले जातात. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. 👉 याशिवाय, ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करण्याची गरज नाही. या खात्यात सरकारी ग्राहकांना 10000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यासह बचत खात्याइतके व्याजाचा लाभ देखील उपलब्ध आहे. 👉 प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाते उघडले जाते. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे जन धन खाते एका खासगी बँकेतही उघडू शकता. तुमच्याकडे इतर बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, जनधन खाते उघडू शकतो. कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? 👉 जन धन खाते उघडण्यासाठी दस्तऐवज पडताळणी केवायसी अंतर्गत केली जाते. या दस्तऐवजांचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
4
इतर लेख