AgroStar
पीएम जनधन योजनेशी जोडले जाऊन करा कमाई!
योजना व अनुदानडेलिहंट
पीएम जनधन योजनेशी जोडले जाऊन करा कमाई!
तुम्ही कमाई करण्यासाठी एखाद्या संधीची वाट पाहत असाल तर तुम्ही बँकेशी जोडले जाऊन चांगला नफा मिळवू शकता. केंद्र सरकार पंतप्रधान जनधन योजनेशी जोडले जाऊन कमाईची संधी मिळेल. जाणून घ्या तुम्हाला किती कमाई करता येईल? या योजनेअंतर्गत तुम्हाला 5000 रुपयांचा निश्चित पगार (Fixed Salary) मिळेल. याशिवाय व्यवहारानुसार तुम्हाला कमिशन देखील मिळेल. याशिवाय बँक मित्रसाठी सरकारकडून एक लोन स्कीम देखील तयार करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत तुम्हाला कम्प्यूटर आणि वाहन इ. साठी कर्ज देण्यात येईल. कोण आहे बँक मित्र? पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत (PMJDY) बँक मित्रांना लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्याठिकाणी बँक शाखा कमी आहेत किंवा एटीएम कमी आहेत त्याठिकाणी सरकारने बँक मित्र नियुक्त केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या सहज बँकिंग सेवा उपलब्ध होतील. पगारासह मिळतील हे फायदे या लोकांना सरकारकडून पगारासह कमिशन देखील देण्यात येतं. बँक मित्रांचा निश्चित पगार 5000 रुपये आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीचं खातं उघडलं किंवा एखाद्या व्यवहार केला तर त्यांना याकरता कमिशन देण्यात येतं, जे आधीपासून निश्चित असतं. बँक मित्रांना कम्प्यूटर आणि वाहन इ. साठी 1.25 लाखांची कर्ज सुविधा देण्यात येईल. तुम्हाला 50 हजार उपकरणासाठी कर्ज, 25 हजार कार्यरत भांडवल आणि 50 हजार वाहन कर्ज मिळेल. यासाठी बँक मित्राला 35 महिने ते 60 महिन्यांपर्यंत कर्ज मिळेल. कोण करू शकतं अर्ज? 18-60 वयोगटातील व्यक्ती बँक मित्र बनू शकतात रिटायर्ड बँक कर्मचारी, शिक्षक, बँकेतील व्यक्ती याकरता अर्ज करू शकतात. केमिस्ट शॉप, किराणा शॉप, पेट्रोल पंप, बचत गट, PCO, कॉमन सर्विस सेंटर देखील बँक मित्र बनू शकतात. काय आहे बँक मित्राचं काम? बँक मित्राचं काम बचत आणि कर्जाची माहिती, अर्ज आणि खात्यांशी संबंधित फॉर्म भरणे, वेळेवर पैसे भरणे आणि रक्कम जमा करणे, पैसे योग्य हातात पोहोचवणे, पावती देणे, खाती आणि इतर सुविधांबद्दल माहिती देणे इ. आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डेलिहंट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
18
इतर लेख