AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम किसान: लवकरच 9 वा हप्ता होणार जमा!
योजना व अनुदानNews 18 lokmat
पीएम किसान: लवकरच 9 वा हप्ता होणार जमा!
"पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील 9 व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 रू. पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार की नाही हे पुढील प्रक्रियव्दारे जाणून घ्या. ➡️ सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा. ➡️ इथं उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल, तिथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा. ➡️ आता एक नवीन पेज उघडेल. ➡️ या पेजवर, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक या पर्यायांपैकी एक निवडा. ➡️ जो पर्याय निवडला आहे त्यावर क्लिक करा. ➡️ तिथं संबंधित क्रमांक भरा. ➡️ यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा. ➡️ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. ➡️ इथं शेतकऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, आधार, राज्य, जिल्हा, गाव, खाते क्रमांक, नोंदणी तारीख आणि नोंदणी क्रमांक दिसेल. ➡️ आता इथं Active आणि In Active ऑप्शन दिसेल. ➡️ Active दिसत असेल तर तुमचे खाते सुरू आहे, असा याचा अर्थ आहे. ➡️ म्हणजेच तुमच्या खात्यावर नववा हप्ता जमा होण्यात काहीही अडचण नाही. ➡️ यादीत नावाचा समावेश आहे का असे तपासा: लाभार्थ्यांच्या यादीत (Beneficiary List )आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’वर क्लिक करा. तिथं राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव या लिस्टमधून आपले पर्याय निवडा. नंतर ‘Get Report’वर क्लिक करा. लाभार्थ्यांची सगळी यादी दिसेल. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून या यादीत तुम्ही तुमचे नाव आहे की नाही हे तपासू शकता. तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात. 👉 पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 👉 पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक : 155261 👉 पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक : 011- 23381092, 23382401 👉 पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन : 011- 24300606 👉 आणखी एक हेल्पलाईन : 0120-6025109 👉 ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
51
10
इतर लेख