AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम-किसान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आधारची आवश्यकता नाही
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पीएम-किसान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आधारची आवश्यकता नाही
नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (पीएम-किसान) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आधार क्रमांकची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेती मंत्रालयाच्या प्रस्तावावर हा निर्णय शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा देशाच्या १२ कोटीहून अधिक लघु व सीमांत शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मिळेल.
पीएम-किसान योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे केली होती. काही राज्यांनी केंद्र सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या यादया पाठविण्यासोबतच आग्रह केला की, राज्यात आधार क्रमांकसह यादी पाठविण्यास थोडा वेळ लागेल. केंद्र सरकारने हा विचार करता आधार जोडण्यामध्ये येणाऱ्या अडचणी व लागणारा वेळ लक्षात घेता, या योजनेच्या आधारच्या अटीला पात्र लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आधार क्रमांकाची आवश्यकता नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार योजनेचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये जाहीर करेल. या योजनेतून शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपये हे तीन टप्प्यांच्या माध्यमातून दोन हजार रुपये दिले जातील. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ०१ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
238
0