AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘पीएम किसान’ योजनेची ‘ही’ अट रद्द
कृषि वार्तासकाळ
‘पीएम किसान’ योजनेची ‘ही’ अट रद्द
नवी दिल्ली- सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना वार्षिक सहा रूपयांची मदत देणाऱ्या ‘पीएम किसान’ योजनेसाठी दोन हेक्टरपेक्षा कमी जमिनीची अट रद्द केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आतापर्यंत पात्र ठरलेल्या १२.५ कोटी शेतकऱ्यांमध्ये आणखी दोन कोटी शेतकऱ्यांची भर पडेल; तर वार्षिक ७५ हजार कोटी रूपये खर्चाच्या योजनेसाठी आणखी बारा हजार कोटी रूपयांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
अर्थात, लघू आणि मध्यम शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. काही राज्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाठविण्यास नकार देऊनही देशभरातील तीन कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक मदत मिळाली होती. आता ही राज्येही फेरविचार करतील, अशी आशादेखील तोमर यांनी पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांना उद्देशन व्यक्त केली. संदर्भ – सकाळ, १ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
167
0