AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम किसान योजनेची मोठी बातमी!
योजना व अनुदानAgrostar
पीएम किसान योजनेची मोठी बातमी!
➡️ पीएम किसान सन्मान निधीचे आपण लाभार्थी असाल, तर हि बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे.कारण पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. ➡️ कृषी उपसंचालक रामप्रवेश यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 15 ते 20 जानेवारी दरम्यान येण्याची शक्यता आहे. त्यासाठी 7 जानेवारी म्हणजेच आज प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शेवटची तारीख आहे. त्यांनी सांगितले की 13 व्या हप्त्यासाठी, ई-केवायसीसह, बँक खाते आधारशी लिंक करा. याशिवाय, बँकेतून NPCI मध्ये आधार लिंक केलेले बँक खाते मिळवा. यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्याची वरील तीन कामे झाली नाहीत तर त्याची पीएम किसान सन्मान निधीची रक्कम थांबवली जाईल. ➡️ या योजनेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. यानंतर केंद्र सरकारने सोशल ऑडिट करून तहसील स्तरावर केलेल्या पडताळणीच्या आधारे कोट्यवधी शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. सूचीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुमचे नाव तपासू शकता. ➡️गेल्या वेळी 8.42 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा लाभ देण्यात आला होता. यावेळी ही संख्या कमी असण्याची शक्यता आहे.कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत सांगितले होते की, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत 12 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे. पहिल्या हप्त्यातील लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती. तर 11 व्या हप्त्यात पीएम किसान निधीचा सर्वाधिक लाभ 10.45 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
8
इतर लेख