AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम किसान योजना : बँक खात्यात पैसे नाही आले तर करा मोबाईलवरुन तक्रार!
कृषि वार्ताकृषी जागरण
पीएम किसान योजना : बँक खात्यात पैसे नाही आले तर करा मोबाईलवरुन तक्रार!
➡️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी देशातील 9करोड शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत खात्यात पैसे जमा केले. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. ➡️परंतु तुम्ही शेतकरी असून या योजनेसाठी ची अहर्ता प्राप्त करत आहात, परंतु अजून पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुमची खात्याची स्टेटस तुम्ही तपासू शकता. ➡️ तुम्हाला https://pmkisan.gov. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. या संकेत स्थळावर पेजच्या उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर चा पर्याय दिसेल. ➡️या पर्यायांमध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून नवीन पेज ओपन होईल. ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता. ➡️आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ट्रांजेक्शन विषयी माहिती मिळते. सातव्या हप्त्या विषयी सविस्तर माहिती ही मिळेल. ➡️जर तुम्हाला एफ टीओ इस जनरटेड अंड पयमेंत कन्फर्मेशन इस पेंडिंग असा दिसल तर समजायचे की ट्रान्सफर ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील. कोणत्या नंबरवर तक्रार करावी? काही शेतकऱ्यांचे नावे मागच्या वेळेस लिस्टमध्ये होते. परंतु नवीन लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर तक्रार दाखल करू शकतात. हेल्पलाइन नंबर पुढील प्रमाणे-०११-२४३००६०६ मंत्रालय संपर्क क्रमांक पी एम किसान टोल फ्री नंबर-१८००११५५२६६ पी एम किसान हेल्पलाइन नंबर-१५५२६१ पी एम किसान लँडलाईन नंबर-०११२३३८१०९२, २३३८२४०१ दरम्यान बऱ्याच वेळा पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज भरताना अर्जदाराकडून अनेक चुका होत असतात. कधी अर्जात दुसरे तर आधार कार्डवर दुसरे नाव असते. तर बरेच अर्जदार आपल्या जन्म दिनांकात चूक करत असतात. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
99
40
इतर लेख