AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम किसान मानधन योजनेशी 20 लाख शेतकरी सामील,तुम्ही हि घ्या फायदा!
कृषी वार्तान्यूज18
पीएम किसान मानधन योजनेशी 20 लाख शेतकरी सामील,तुम्ही हि घ्या फायदा!
प्रधान मंत्री किसान योजना ही शेतकर्यांसाठी सर्वात मोठी पेंन्शन योजना आहे, ज्यामध्ये आतापर्यंत २०,१९,२२० शेतकर्यांची भर पडली आहे, ज्यांनी ६० वर्षे पूर्ण केले त्यांना महिन्याला ३००० रुपये पेंन्शन मिळेल._x000D_ सर्व १२ कोटी लघु आणि सीमांत शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात, ज्यांची २ हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ रोजी झारखंडमधून केली होती._x000D_ या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. एखादा शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पंतप्रधान-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभामध्ये थेट हातभार लावू शकतात._x000D_ जर शेतकरी मध्यभागी योजना सोडली तर त्याचे पैसे गमावणार नाहीत. जोपर्यंत तो योजना सोडत नाही, तोपर्यंत जमा केलेल्या रकमेवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज मिळेल. जर शेतकरी मरण पावला तर त्याच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये मिळतील._x000D_ _x000D_ पेन्शन योजनेच्या फायद्यासाठी महत्वाच्या गोष्टी_x000D_ १) वय १८ वर्ष ते ४० वर्षे असावे._x000D_ २) ईपीएफओ, ईएसआयसीचा सदस्य आणि आयकर न भरणारा._x000D_ ३) आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे._x000D_ ४) वयानुसार ५५ ते २०० रुपये प्रीमियम. सरकार एवढे पैसे देईल._x000D_ ५) वयाच्या ६० व्या वर्षानंतर तुम्हाला महिन्याला ३०० रुपये पेंन्शन मिळेल._x000D_ ६) नजीकच्या सामान्य सेवा केंद्रात (सीएससी) नोंदणी करता येते._x000D_ _x000D_ स्रोत - न्यूज 18, ६ मे २०२०,_x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_
513
0
इतर लेख