कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार!सरकारची नेमकी योजना काय?
➡️ पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचे हप्ते येऊ शकतात.
➡️ माध्यमांच्या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास मोदी सरकार लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना गिफ्ट देऊ शकते. अहवालानुसार, केंद्र सरक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करीत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 12000 रुपये मिळू शकतात.
➡️ मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- न्यूज १८ लोकमत
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.