AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिठ्या ढेकूण कीड प्रादुर्भाव आणि उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिठ्या ढेकूण कीड प्रादुर्भाव आणि उपाययोजना!
➡️पिठ्या ढेकूण हि कीड डाळिंब , भेंडी, वांगी, पेरू, आंबा अश्या विविध पिकांमध्ये आढळून येते. हि कीड पानांमधील, कोवळ्या फांदीमधील रसशोषण करते यामुळे पाने पिवळी पडून सुकून जातात तसेच या किडीच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या तसेच बुरशीची लागण झालेली दिसून येते. बुरशीमुळे पानांची अन्ननिर्मिती क्रिया मंदावते. पिठ्या ढेकूण हि कीड उष्ण आणि कोरड्या वातावरणात जास्त वाढते तसेच या किडीच्या शरीरावर कापसासारखा चिकट थर असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. ➡️ यावर उपाययोजना म्ह्णून निम तेल ३० मिली आणि मेंटो ६ ग्रॅम प्रति १५ लिटर मिसळून फवारणी करावी जेणेकरून किडीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख