अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकास रासायनिक खते वापरताना घ्यावयाची काळजी
➡️पिकास सर्व नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी न देता पीक वाढीच्या अवस्थेत विभागून द्यावी. जेणेकरून नत्रयुक्त खतांचा ऱ्हास होणार नाही. ➡️पेरणीच्या वेळी खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या साहाय्याने दिल्यास खते झाडाच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन पिकास अधिक फायदा होतो. ➡️रोपावस्थेत खते वापरताना खते रोपभोवती रिंगण पद्धतीने टाकावीत परंतु खतांचा रोपांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ देऊ नये अन्यथा रोपे खराब होण्याची शक्यता असते. ➡️ओलसर खते वापरताना खते कोरड्या मातीत मिसळून द्यावीत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
इतर लेख