AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पिकामध्ये सिलिकॉन चा वापर महत्वाचा!
🌿ताण म्हणजे वातावरणातील बदलांमुळे किंवा कीड-रोग यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होऊन पिकांची वाढ मंदावते आणि उत्पादकता घटते. या ताणतणापासून पिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 🌿जैविक ताण म्हणजे विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो ताण पिकावरती निर्माण होतो त्याला जैविक ताण म्हणतात आणि वातावरणातील बदल जसे तापमानातील चढउतार, अतिरिक्त पाऊस, थंडी यामुळे पिकावरती जो ताण येतो त्याला अजैविक ताण म्हंटल जात. 🌿जैविक आणि अजैविक ताणापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पुढील पद्धतीने व्यवस्थापन करावे. ✔ पीक लागवड करण्याअगोदर जमिनीची खोल नांगरणी करून जमीन उन्हामध्ये तापवून द्यावी जेणेकरुन कीड-रोगाच्या ज्या सुप्तावस्था जमिनीमध्ये असतात त्या जमिनीवरती येऊन नष्ट होतात आणि पुढील पिकामध्ये प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर मशागत करून पिकाची लागवड करावी. ✔ लागवड करत असताना पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे. तेच पीक किंवा त्याच वर्गातील पीक प्रत्येक हंगामात घेणे टाळावे जेणेकरून किडीरोगास थेट पुरवठा कमी करण्यास मदत होते. ✔ लागवडीसाठी वाण निवडताना किडीरोगास सहनशील वाणांची निवड हंगामानुसार करणे गरजेचे आहे. ✔ पिकाची लागवड करताना दोन सरींमध्ये आणि दोन रोपे/बियाणे यामध्ये पिकानुसार योग्य अंतर ठेवून लागवड करावी कारण अंतर कमी झाल्यास वाढीसाठी दाटी निर्माण होते आणि पीक विविध रोग तसेच किडींना बळी पडते. ✔ पिकात वाढणारी तणे हि विविध किडींसाठी आश्रय पीक म्हणून काम करतात तसेच पिकासोबत अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा देखील निर्माण करतात. त्यामुळे ज्या पिकामध्ये शक्य आहे अशा ठिकाणी तणनाशकाचा उपयोग करून अथवा खुरपणी करून तण नियंत्रीत ठेवावे. ✔ पिकामध्ये चिकट,कामगंध आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा जेणेकरून वेळेत कीड नियंत्रण करण्यासाठी मदत होते. ✔ कीड-रोग प्रादुर्भाव ग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी आणि त्यानंतर शिफारशीनुसार किडीचा प्रादुर्भाव असल्यास योग्य कीटकनाशक आणि रोगाचा प्रादुभाव असल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी. ✔ उन्हाळयात जास्त तापमान व कमी पाण्याचा ताण यामुळे पिकाच्या वाढीमध्ये तसेच उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे तसेच फळ पीक असल्यास झाडाच्या मुळांजवळ पालापाचोळा काडीकचरा गोळा करून टाकावा जेणेकरून जमिनीतील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होणार नाही व जमिनीत ओलावा टिकून राहील. ✔ पिकांवरील जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी ऑर्थो सेलिसिलिक ऍसिड 2 % घटक असणारे सिलिकॉन 1.5 मिली प्रति लिटर प्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी सोबतच पिकाच्या अवस्थेनुसार इतर अन्नद्रव्यांचा योग्य वापर करणेही तितकेच महत्वाचे आहे. ✔ अश्या पद्धतीने व्यवस्थापन केले तर नक्कीच विविध किडी-रोगांमुळे आणि वातावरणातील बदलामुळे पिकावरती येणारा ताण कमी करणे सोपे होईल व पिकाची गुणवत्ता सुधारून उत्पादन वाढीसाठी मदत होईल. 🌿संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
3
इतर लेख