पिकामध्ये चिकट सापळ्यांचे महत्व!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकामध्ये चिकट सापळ्यांचे महत्व!
भाजीपाला, फळपीक तसेच फुलपिकांमध्ये सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत पिवळ्या तसेच निळ्या अशा दोन्ही चिकट सापळ्यांचा वापर करावा. पिवळ्या सापळ्यांकडे सफेद माशी, मावा, तुडतुडे आकर्षित होते व निळ्या सापळ्यांकडे फुलकिडे आकर्षित होतात. यामुळे आपल्याला पिकात कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आहे व किती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो त्यामुळे पिकात कुठल्या कीटकनाशकाची फवारणी घेणे गरजेचे आहे हे समजते तसेच अतिरिक्त औषधांचा वापर व होणार खर्च टाळला जातो. चिकट सापळे जास्त प्रमाणात लावले तर कीडही नियंत्रणास मदत होते. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
17
इतर लेख