कृषि वार्ताAgroStar India
पिकात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
👉टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय पिके तसेच केळी आणि पपईमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हे रोग एकदा पिकावर आल्यास त्यावर कोणताही उपाय लागू शकत नाही, त्यामुळे पिकाचे संपूर्ण नुकसान होऊ शकते. विषाणूजन्य रोगांचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडींमुळे होतो, त्यामुळे या किडींवर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
👉रस शोषक किडींचे नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीपासून चिकट सापळे बसवावेत, जे किडींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. पीक वाढीच्या अवस्थेत थायमीथाकझम 75% घटक असणारे शटर यासारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक आळवणी करावी. तसेच, किडीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे.
👉याशिवाय, पिकांची फेरपालट, जमिनीची मशागत आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास पिके विषाणूजन्य रोगांना कमी बळी पडतात. योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवून ठेवता येते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.